Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

‘व्याही, पत्नीचे आई-वडील यांनाही आरक्षण दिलं पाहिजे, मंत्र्यांना हमेशा भेटायला जान अडचणीचं होतंय. त्यामुळे मंत्र्यांचे दोन-चार बंगले तेथेच बांधा


मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला देण्यात आलेली मुदत दोन दिवसांवर (24 डिसेंबर) आली आहे. यादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे.

जरांगे यांनी आधी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली, त्यानंतर आता जरांगे आणि सरकारमध्ये सोयरे शब्दावरून मतभेद सुरू आहेत यावर भुजबळांनी जोरदार उपरोधक टीका केली .

आईला ओबीसी आरक्षण असेल तर मुलाल देखील ते मिळालं पाहिजे अशी नवीन मागणी जरांगे यांनी केली. यावर भुजबळांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला .

भुजबळ म्हणाले की, माझी भूमिका अशी आहे की, जरांगेचं आपण ऐकलं पाहिजे आणि जे सोयरे म्हणजे पत्नीचे आई-वडील, व्याही आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. त्यांचे जी दुसरी मुलं आहेत त्यांना देखील आरक्षण दिलं पाहिजे. त्या मुला-मुलींचे दुसरे सासू-सासरे आणि त्यांच्या मुलांना देखील आरक्षण दिले पाहिजे. व्याह्यांचे व्याही, व्याह्यांचे व्याही या सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे.

तिथेच मंत्र्यांचे बंगले बांधले पाहिजेत…

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली होती, यावर देखील भुजबळांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, आपण जरांगेचं ऐकलं पाहिजे, अन्यथा ते मोर्चा घेऊन येतील, नाहीतर अजून काही तरी करतील. त्यापेक्षा ते म्हणत आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्या. सारखं-सारखं मंत्री त्यांना भेटायला जात आहेत, ते फार अडचणीचं होतंय. त्यामुळे मंत्र्यांचे दोन-चार बंगले आणि मुख्य सचिवांचं ऑफिस देखील तीथं कार्यान्वित केलं पाहिजे.

पुढे ते शेतकरी, शिक्षण विकासाच्या बाबतीत देखील सांगतील त्यामुळे तीथं मंत्र्यांच्या राहण्याची सोय झाली तर जाण्या-येण्याचा त्रास वाचेल असा टोला छगन भुजबळ यांनी राज्य सरकारमधील नेत्यांना यावेळी लगावला.

जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर ते मोर्चा वगैरे घेऊन येतील आणि त्यांनी सांगितलं की, सरकारला हे फार भारी पडेल. त्यामुळे सरकारने घाबरून ही कामे ताबडतोब केली पाहिजेत असा उपरोधिक टोला देखील भुजबळांनी लगावला. जरांगेना देव सुद्ध घाबरणार, त्यांचं काहीच चूक नाही, जिथं देवाची देखील पर्वा नाही तिथं सरकार काय चिज आहे. ते म्हणतील तसा जीआर आपण काढला पाहिजे. नवीन-नवीन कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात त्याचा आदर राखायला आपण शिकलं पाहिजे असेही भुजबळ खोचकपणे म्हणाले.

”देव जरी खाली आला तरी आरक्षणाशिवाय राहणार नाही” – मनोज जरांगे पाटील


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *