महाराष्ट्रराजकीय

तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. तर मग काँग्रेसची सत्ता बरी


दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी म्हणेल काँग्रेसची सत्ता बरी आहे. कारण तेव्हा तुम्ही म्हणत होता इस्लाम खतरे में है.

हे बांगलादेशाला बोलत आहेत. बांगलादेशात काय चाललंय. अहो तुमचे लोक काय करत आहे. मला गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. आमचं सरकार खेचलं. शकूनी मामा गद्दारांना घेऊन काम करत आहे. संघाला सवाल आहे. १०० वर्ष घालवली घ्या चिंतन करा. का १०० वर्ष वाया घालावली. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का. पूर्वीचा भाजप वेगळा होता. त्यात पावित्र्य होतं. आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. संकरीत गायी सारखं. परदेशी वळूंची बिजं गर्भाशयात झाला. तसा भाजप झाला. तो भाजप आमच्यावर राज्य करणार. एवढा वाईट विचार कुणी दिला नव्हता. गद्दार आणि चोरांना नेता मानून राज्य करावं लागतं यातच तुमचा पराभव आहे.’

 

‘गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात.’

 

‘प्रत्येक राज्यात मंदिर उभारले पाहिजे. त्या मंदिरावर शिवाजी महाराजांचे मंत्र कोरले जातील. केवळ शिवजयंतीला पुतळे पुसायचे एवढ्या पुरते आम्ही मर्यादित नाही. मोदीजी तुम्हाला आणि मिंध्यांना शिवाजी महाराज मतं मिळवणारं यंत्र वाटत असेल. ते काही ईव्हीएम नाही. ईव्हीएम सारखं महाराजांना मानू नका. मी महाराजांना देव मानतो. जो मंदिराला विरोध करेल त्याला लोक बघून घेतील. शिवाजी महाराजांचं मंदिर नाही बांधायचं तर मोदींचं बांधायचं का.’

 

‘मला संघाबद्दल, भागवत यांच्याबद्दल आदर आहे. पण ते जे काही करत आहेत. त्याचा आदर नाही. तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या कुणाबद्दल सांगत आहात. तुम्ही म्हणता हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. मग दहा वर्षापासून विश्वगुरू बसलाय. अजून संरक्षण नाही करू शकला.’

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *