ताज्या बातम्या

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एक हजार ५६६ अहवालापैकी ४५१ अहवाल कोरोनाबाधित (Corona Positive)


नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या एक हजार ५६६ अहवालापैकी ४५१ अहवाल कोरोनाबाधित (Corona Positive)आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९४ हजार ६५५ एवढी झाली असून यातील ८८ हजार ९०० रुग्णांना रुग्णालयातून (Hospital)सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला तीन हजार १०० रुग्ण उपचार घेत असून तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निळकंठ भोसकर यांनी कळवले आहे.

मंगळवारी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी तीन,नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण २९२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १७, खाजगी रुग्णालय चार अशा ३१६ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

आज तीन हजार १०० कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी ३२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल सात, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६१०, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण दोन हजार ४३३, खाजगी रुग्णालय १५, हदगाव एक, बिलोली दोन अशा एकूण तीन हजार १०० व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

पॉझिटिव्ह – ९४ हजार ६५५

कोरोनामुक्त – ८८ हजार ९००

मृत्यू – दोन हजार ६५५

मंगळवारी पॉझिटिव्ह – ४५१

मंगळवारी कोरोनामुक्त – ३१६

मंगळवारी मृत्यू – शुन्य

उपचार सुरु – तीन हजार १००

अतिगंभीर प्रकृती – तीन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *