आ.सुरेश धस यांची कंन्टेमेंट झोनमध्ये प्रवेश केल्या प्रकरणातुन निर्दोष मुक्तता
आ.सुरेश धस यांची कंन्टेमेंट झोनमध्ये प्रवेश केल्या प्रकरणातुन निर्दोष मुक्तता
बीड : आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणुचे लागण झालेले रुग्ण आढळुन आल्याने बीड जिल्हयात व इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये या कारणामुळे सांगवी पाटण या गावापासुन तीन किमी परीसरातील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कंन्टेमेंट झोन घोषित करण्यात आला होता.त्या परिसरात अनिश्चित कालावधीसाठी संचार बंदी आदेश लागु करण्यात आली होती.या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आ.सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणातून आ.धस यांची निर्दोष मुक्तता आष्टी न्यायालय प्रथम वर्ग न्यायाधीश के.के.माने यांनी केली आहे.हे प्रकरणाची आ.धस यांच्यावतीने फौजदारी वकील ॲड.राकेश हंबर्डे व ॲड.महादेव मोहिते यांनी काम पाहिले.
बीड जिल्हाधिकारी यांनी दि.१७ मे २०२० रोजी संचारबंदीचा आदेश निर्गमीत करण्यात आले की, सांगवी पाटण येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावापासुन तीन किमी परीसरातील सांगवी पाटण, खिळद पाटण,कोहीनी.कारखेल तांडा हा परीसर कंन्टेमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला होता.त्यापुढील चार किमी परीसरातील लिंबोडी, धामनगाव, सुरडी,कारखेल बु,डोईठाण,बाबी,लाटेवाडी व महाजनवाडी ही गावे बफर झोन म्हणुन घोषीत करुन वरील सर्व गावे व परीसर अनिश्चीत कालावधीसाठी पुर्ण वेळ बंद करण्यात येवुन संचार बंदी लागु करण्यात आली होती.हे असताना देखील दि. १८ मे २०२० रोजी आ.धस यांनी सांगवी पाटण या गावात जावुन बीड जिल्हाधिकारी यांचे संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केले व कोवीड-19 साथ रोगाचे संसर्ग पसरवीण्यासारखे हयगयांचे व घातक कृती करुन राष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली असताना सुदधा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापान कायदा २००५ च्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन आ.धस यांच्यावर कलम,१८८,२६९,२७० भादवी सह कलम ५१ (ब)रा.अ.व्य.आधि.२००५ सह कलम १७ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले.तर आ.धस यांच्याबाजूने आष्टी न्यायालयाचे विधीज्ञ ॲड.राकेश हंबर्डे यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे दाखल करून सरकार पक्षाला पोलीस दर्जाच्या शिपायांस अशा अपराधाची तक्रार देता येत नाही व सरकार पक्षाने कसलेही कागदोपत्री पुरावा मा.कोर्टासमोर सादर केला नाही.स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही आदी बाबी भक्कमपणे अंतिम विवेचनात मा.कोर्टाच्या समोर मांडल्या.आष्टी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या खटल्याची प्रभावीपणे भक्कम बाजू मांडत आ.धस यांची सबळ पुराव्या अभावी आष्टी न्यायालय प्रथम वर्ग न्यायाधीश के.के.माने यांनी निर्दोष मुक्तता केली.त्यांना ॲड.महादेव मोहीते, ॲड.बप्पासाहेब खिलारे,ॲड.भाऊसाहेब आजबे यांनी सहकार्य केले तर आष्टी न्यायालयातील सर्व विधीज्ञानी फौजदारी वकील ॲड.राकेश हंबर्डे यांचे अभिनंदन केले.