ताज्या बातम्याबीड जिल्हा

बीडमध्ये भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू , कार चक्काचूर


बीड : बीड जिल्ह्यात एक भयानक अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. परळीकडून एक स्विफ्ट डिझायर कार येत होती. ही कार प्रचंड वेगात होती.ही कार तेलगाव येथे आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट बाभळीच्या झाडाला धडकली. ही धडक एवढी भयानक होती की, दूरपर्यंत या अपघाताचा आवाज आला. संबंधित घटना ही आज संध्याकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली.

गावकऱ्यांनी आणि रस्त्यावर थांबलेल्या काही नागरिकांनी गाडीत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. अखेर प्रशासानाला जेसीबी मागवावा लागला. जेसीबीच्या साहाय्याने कारमधून तिघांना बाहेर काढावं लागलं.

त्यापैकी दोघांचा मृत्यू झालेला होता. तर एक गंभीर जखमी होता. जखमीला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नेमकं काय घडलं? नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरुण स्विफ्ट डिझायर गाडीने भोकर येथून बीडला जात होते.

या दरम्यान तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या बाभळीच्या झाडाला या गाडीची जोरात धडक बसली. हा अपघात प्रचंड मोठा होता. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. युनूस शेख, सचिन मोकमपल्ले असं मृतक व्यक्तींचे नावे आहेत.

तर अमोल वाघमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण आणि हृदयद्रावक होता की, मृतक आणि जखमींना तेलगाव येथील नागरिकांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले.संबंधित घटना प्रचंड भयानक होती. अपघात घडल्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तातडीने घटनास्थळ घातलं. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा गाडीचा अपघातात चक्काचूर झालेला बघायला मिळाला. या चक्काचूर झालेल्या गाडीतून अपघातग्रस्तांना बाहेर काढणं कठीण होतं. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले.

अखेर अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेसीबी मागवला. पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने अपघातग्रस्तांना बाहेर काढले. पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं. तसेच एक जण गंभीर जखमी असलेल्या अवस्थेत होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *