ताज्या बातम्या

शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर, ठाकरे गटाविरोधातच दिला उमेदवार


पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा आता सुटला असं चित्र आहे. ठाकरे गटापाठोपाठ आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडूनही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

एकूण 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादी आधी 45 उमेदवार जाहीर केले होते. आता एकूण 65 उमेदवार जाहीर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील दोन उमेदवार घोषित करण्यात आले आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम तर खडकवासल्यातून सचिन दोडके यांना उमेदवारी दिली आहे. पण परांडा मतदारसंघामध्ये ठाकरे गटानेही उमेदवारी जाहीर केली आहे. परांडा येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून रणजीत पाटील यांना देण्यात आले आहे. तर आता शरद पवार गटाकडून परांडा मतदारसंघातून राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे.

 

परांडा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेने रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ‘सामना’मध्ये ज्ञानेश्वर पाटलांचे चिरंजीव रणजित पाटील यांचे नाव नव्हते. अधिकृत एबी फॉर्म रणजित पाटील यांना दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आपली उमेदवारी दाखल केली. जयंत पाटलांनीही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या जागेवरचा संघर्ष कायम आहे. निवडणूक प्रक्रियेची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख येईपर्यंत हा संघर्ष आता कायम राहणार का?

 

शरद पवार गटाची दुसरी यादी

1. 16 एरंडोल – सतीश अण्णा पाटील
2. 111 गंगापूर – सतीश चव्हाण
3. 135 शहापूर – पांडुरंग बरोरा
4. 243 परांडा – राहुल मोटे
5. 230 बीड – संदीप क्षीरसागर
6. 44 आर्वी -मयुरा काळे
7. 116 बागलान – दीपिका चव्हाण
8. 119 येवला – माणिकराव शिंदे
9. 120 सिन्नर – उदय सांगळे
10. 122 दिंडोरी – सुनीता चारोस्कर
11. 123 नाशिक पूर्व – गणेश गीते
12. 141 उल्हासनगर – ओमी कलानी
13. 195 जुन्नर – सत्यशील शेरकर
14. 206 पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
15. 211 खडकवासला -सचिन दोडके
16. 212 पर्वती- अश्विनीताई कदम
17. 216 अकोले -अमित भांगरे
18. 225 अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर
19. 254 माळशिरस – उत्तमराव जानकर
20. 255 फलटण – दीपक चव्हाण
21. 271 चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. 279 इचलकरंजी – मदन कारंडे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *