परळीत आ.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचा शुभारंभ
परळी वैजनाथ : परळी शहरात प्रथमच खास महिलांसाठी मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे ह्या उपस्थितीत होत्या. आहार व व्यायामाच्या माध्यमातून आयुष्याला सुंदर बनवा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिपादन केले.मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचाच्या माध्यमातून परळी व परिसरातील महिलांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाल्याने परळीकरांचे आरोग्य सुधारत असल्याचे सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी सांगितले.
परळी वैजनाथ शहरातील डॉ. देशपांडे यांच्या दवाखान्या मागे कन्या शाळा रोड परिसरात महिलांसाठी प्रथमच मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचा शुभारंभ भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पार पडले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे यांनी सेंटरला शुभेच्छा दिल्या. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री धनंजय मुंडे ह्या उपस्थितीत होत्या. याप्रसंगी बोलताना आ.पंकजाताई व सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आजच्या धावत्या व धकाधकीच्या जीवनात महिलांनी फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आपले शरीर निरोगी व आरोग्यदायी कसे राहील याचे मार्गदर्शन करताना मधुराज डान्स स्टुडिओ ला जॉईन होऊन आपले शरीर निरोगी व आरोग्यदायी ठेवावे असे आवाहन केले.
याप्रसंगी आ.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, राजश्रीताई धनंजय मुंडे, मनीषाताई अजय मुंडे, प्राजक्ता ताई श्रीकृष्ण कराड, अक्षता ताई सुशील दादा कराड, संध्याताई प्रतापराव धर्माधिकारी, प्रीतीताई बालाजी मिसर या प्रमुख मान्यवरांची उपस्थितीत होत्या. तसेच शहरातील विविध व्यवसायातील व घरगुती अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओच्या संचालिका सौ.मधुरा विशाल पाठक यांनी सर्वमान्यवराचे स्वागत करून मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओ सुरू करण्यामागची भूमिका विषद केली.आहारातून आरोग्याकडे प्रत्येकाला नेण्यासाठी फिटनेस सेंटर सुरू करण्यात आले.मधुराज फिटनेस अँन्ड डान्स स्टुडिओचा महिलांनी सेंटरचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी वासुदेव अनंतराव पाठक ( मा. नगरसेवक )
सुवर्णा वासुदेवराव पाठक, दत्तात्रय विठ्ठलराव कुलकर्णी, भारतीताई दत्तात्रय कुलकर्णी मा. नगरसेविका उपस्थितीत होते.
परळी शहरात महिलांसाठी प्रथमच नव्याने सुरू झालेल्या मधुराज फिटनेस अॅण्ड डान्स स्टुडिओत महिलांसाठी एरोबिक्स, स्टेप एरोबिक्स, झुम्बा, कार्डिओ, मेडिटेशन, योगा इतर वर्कआऊटस् डमबेल्स वर्कआऊट, स्टीक वर्कआऊट, लेझिम वर्कआऊट, बॉलीवुड डान्स, 3 ते १२ वयोगटातील मुला-मुलिंसाठी क्लासिकल डान्स, फोल्क डान्स, बॉलीवुड डान्स, फ्री स्टाईल डान्स झुम्बा, एरोबिक्स, मेडीटेशन, योगा आदी सुविधा असणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मधुरा पाठक तर दीपा अमित भताने यांनी आभार मानले.