ताज्या बातम्या

सरकार आल्यावर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 2 हजार देणार


मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. उलट राज्यात आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले.

 

मुक्ताईनगर येथे सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत.

 

आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही तर कॉमन मॅन असल्याचे सांगताच मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) त्यांनी जाहीर केले. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *