ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांचं ठरलं! जाणून घ्या कुठे अन् कसे उभे करणार उमेदवार?


विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती.

याबाबत जरांगे पाटील यांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “जिथे उमेदवार निवडणून येण्याची शक्यता आहे तिथेच उमेदवार उभे करायचे. यासह एससी आणि एसटीच्या जागा आहेत तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही.”

 

ते पुढे म्हणाले की, “जे कोणी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, त्या सर्वांनी अर्ज भरावे. अर्ज भरण्याच्या शेवटीच्या दिवसापर्यंत मी मतदारसंघांचा अंदाज घेऊन कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा याचा निर्णय घेणार.”

 

एक शिक्का मतदान

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “या निवडणुकीत 80% पेक्षा जास्त मतदान एक शिक्का चालणार आहे. मतदार यादी चाळा गावतील नसलेले मतदान शोधून काढा आपल्याला मतदान एजंट गरज नाही, अख्खा गावच एजंट असणार आहे. उमेदवार गडबड करत आहेत लवकर डिक्लेर करा म्हणत आहेत, का? तर तयारी करायची आहे. आपण 13 महिने काय केल? तयारी केलीच आहे की. आपण उमेदवार, चिन्ह सांगितल्यावर दोन घंट्यात हे चिन्ह जगात माहित होणार आहे, चिंता करू नका. ते 20 नोव्हेंबरला शांत डोक्याने मतदान करतील.”

मराठा समाजाच्या लोकांसमोर निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले, “ज्या विषयाला आपल्याला हात घालण्याची गरज नव्हती. ती वेळ आपल्यावर आली आहे. हा संघर्ष राजकारणासाठी नव्हता. गरजवंत मराठ्यांची राजकारण ही गरजच नव्हती. मुलांसाठी उठाव केला. राजकारण करायचे आमच्या मनाला कधी शिवलेही नाही? पण आता निर्णय घ्यावा लागणार आहे.”

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *