ताज्या बातम्या

ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार बोनस; थेट खात्यात जमा होतील 5500


राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरु केली आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. या दिवाळी बोनसबाबात जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

 

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्त्वाकांशी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियमावलीचं पालन करावं लागतं. वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.

 

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *