ताज्या बातम्या

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंनी जनतेला दिले वचन


मुंबई : शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटकडून वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागले. यंदाचा ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सुरु आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

जनेतला दिले आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरुन उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. तसेच, यावेळी मोठी घोषणा केली असून राज्यात आपली सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात आपण शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, प्रभू श्रीरामांची जशी मंदिरं आहेत, तसेच आमच्या शिवरायांची मंदिरं बांधण्यात येतील, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.

 

आज दसरा रामाने रावणाचा वध केला म्हणून साजरा करतो. प्रभू रामांबरोबर वानरसेना होती. ते आमचे देव आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे देव आहेत. ते मत मिळवण्याची मशिन नाही. जसे आम्ही ‘जय श्रीराम’ म्हणतो तसेच ‘जय शिवराय’ म्हणतो. ‘जय शिवराय’ हा महाराष्ट्राचा मंत्र! असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *