ताज्या बातम्या

तामिळनाडूत रेल्वेचा भीषण अपघात! म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसची मालगाडीला समोरा समोर धडक


तामिळनाडूत शुक्रवारी रात्री भीषण रेल्वे अपघात झाला. बिहारला जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसचे सहा डबे मालगाडीला धडकल्याने रुळावरून घसरले. हा अपघात ऐवढा भीषण होता की, रेल्वेच्या काही डब्यांना आग लागली.

येथे व्हिडिओ पहा

या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे म्हैसूरहून पेरंबूरमार्गे बिहारमधील दरभंगाकडे जात होती. दरम्यान, तिरुवल्लूरजवळील कवरप्पट्टाई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला ही रेल्वेगाडी जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. कर्मचाऱ्यांनी बचवकार्यास सुरुवात केली आहे. रुग्णवाहिका आणि एनडीआरएफची पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.

 

या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना दक्षिण रेल्वेने सांगितले की, म्हैसूरहून दरभंगाकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक १२५७८ (एमवायएस-डीबीजी) चे सहा डबे रात्री १०.३० च्या सुमारास मालगाडीला धडकून रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर काही जण जखमी झाले आहेत. चेन्नई सेंट्रलयेथून मेडिकल रिलीफ व्हॅन आणि बचाव पथके रवाना झाली आहेत.

याआधी गुरुवारी रात्री बिहारमधील कटिहारमध्ये रेल्वे अपघात झाला होता. न्यू जलपाईगुडीहून कटिहारकडे जाणारी मालगाडी सुधानी-बारसोई स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. यावेळी एका मार्गावरील रेल्वेची वाहतूक तासनतास ठप्प झाली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *