Raj Thackeray : 2000 मध्ये मी राजकारणात रिव्हर्स गिअर टाकला होता, असं मोठं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
केवळ एका व्यक्तीमुळे मी राजकारणात परत आलो, त्यांचं नाव साजिद नाडियाडवाला असं आहे. हेही त्यांची एक बाजू आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
2000 साली मी जेव्हा एका वेगळ्या पक्षात होतो. त्यावेळी त्या पक्षात जे काही सुरु होतं, हे पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला होता. मला आता नको ते राजकारण असं वाटत होतं. मला राजकारण करण्याची काहीच इच्छा राहिली नव्हती. मला तिथे जायचचं नव्हतं. मला असला गोंधळ घालून काही करायचं नाही. मी हळूहळू राजकारण सोडून देणार होतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
मी आणि साजिद नाडियाडवाल त्यावेळी अनेकदा भेटायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरु करायची आहे. मला फिल्म प्रोडक्शन करायचं आहे, असं मी त्यांना सांगायचो. पण, एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याच कारण हे साजिद नाडियाडवाल आहेत, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यावेळी साजिद नाडियाडवाल व्यासपीठावर उपस्थित होते.
साजिद नाडियाडवाला यांनी मला सांगितलं की, मी प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर कशापद्धतीने काम करतो हे मला माहिती आहे. काय काय करावं लागतं हे मला माहिती आहे. राज ठाकरे प्रोड्युसर बनून त्या गोष्टी करताना मला पाहवणार नाही. तुम्ही ज्याठिकाणी आहात त्याठिकाणी राहा. फिल्म बनत राहतील. पुढेही बनतील. त्यामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रीय झालो, असा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.