झारखंडमध्ये हनी ट्रॅपचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका तरूणीने एका मोठ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्याला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून पैसे उकळले.
तसेच जास्त पैसे देण्यास नकार दिल्याने तिने साथीदारांच्या मदतीनं अधिकाऱ्याला मारहाण देखील केली. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह तिच्या चार साथीदारांना अटक केली आहे. या बाबतचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. `टीव्ही नाईन हिंदी`ने या बाबतचे वृत्त दिले आहे.
झारखंडची राजधानी रांचीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. जमशेदपूर येथील एका तरुणीनं मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. हॉटेलमध्ये बोलवून त्याचे नग्न व्हिडिओ शूट केले. करण्याची धमकी देत त्या अधिकाऱ्याकडून 50 लाख रुपये उकळले. प्रेयसीनं त्याच्याकडे आणखी पैसे मागितले. पण त्याने पैसे न दिल्याने प्रेयसीनं साथीदारांच्या मदतीनं त्याला मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेदपूर येथील श्वेतानं सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील मल्टिनॅशनल कंपनीचा अधिकारी मेहुल साह याच्याशी मैत्री केली. लवकर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघं एकमेकांशी संवाद साधू लागले. या दरम्यान दोघांमध्ये वाद झाले आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर तरूणी रांचीत राहायला आली.
श्वेतानं या प्रकाराची माहिती तिच्या मित्रांना दिली. तिनं मेहुलला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याची योजना आखली. आरोपी तरूणीनं मेहुलला स्वतःचे अश्लील व्हिडिओ पाठवत भेटायची इच्छा व्यक्त केली. तिनं मेहुलला रांचीला बोलावले. मेहुल रांचीला पोहोचताच त्याची प्रेयसी श्वेता आणि तिच्या मित्रांनी त्याला शहरात फिरायला नेलं. त्यांनी मेहुलसाठी रांचीतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रूम बुक केली. तिथं श्वेता आणि मेहुल राहायला गेले. यादरम्यान श्वेतानं मेहुलचे अश्लील व्हिडिओ शूट केले.
श्वेतानं मेहुलला हे करण्याची धमकी दिली. तसेच हे व्हिडिओ तुझ्या कुटुंबियांना पाठवेन असं सांगितलं. मेहुलनं दिलेल्या माहितीनुसार, `श्वेता आणि तिच्या साथीदारांनी त्याच्याकडून सुमारे 50 लाख रुपये हवालाच्या माध्यमातून वसूल केले. त्यानंतर तरूणी आणि तिचे मित्र त्याच्याकडे आणखी पैसे मागू लागले.` यावरून मेहुल आणि श्वेता यांच्या रांची येथे वाद झाले. श्वेतानं मित्रांच्या मदतीनं मेहुलला मारहाण करण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक केली. जेव्हा पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. पीडित मेहुलच्या पत्नीनं रांची विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी युवतीसह तिच्या चार साथीदारांना अटक केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.