आंब्याच्या सीजनला सुरुवात झाली आहे, बाजारात विविध प्रजाचीचे आंबे दाखल झाले आहे. आपल्या देशात आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय आंब्याला फळांचा राजा असेही म्हटले जाते.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.
भारत आंब्याचा प्रमुख निर्यातदार देश
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याला आपल्याकडे मोठी मागणी असते. हा आंबा सरासरी दीड ते 2 हजार रुपये डजन इतक्या किमतीने विकला जातो. यासह बैंगनपल्ली, हिमसागर, दसरी, लंगडा, मालदा आणि इतर अनेक जातींचे आंबे भारतात पिकवले जातात. त्यामुळे भारत हा आंब्याचा प्रमुख निर्यातदार देशही आहे.
हा आहे सर्वात महागडा आंबा
भारतात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असले तरी जगातील सर्वात महागडा आंबा हा भारतात नव्हे तर जपानमध्ये पिकवला जातो. या आंब्याचे नाव मियाझाकी आंबा असे आहे. या आंब्याचा रंग जांभळा असतो. मियाझाकी आंबा हा जपानमधील मियाझाकी शहरात पिकवला जातो त्यामुळे त्याला हे नाव मिळाले आहे. मात्र आता भारत, थायलंड, फिलीपिन्स आणि बांगलादेशमध्ये देखील या आंब्याची लागवड केली जाते.
मियाझाकी आंब्याचे वैशिष्ट्ये काय आहे?
मियाझाकी या जातीच्या आंब्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि सूर्यप्रकाश असणारे हवामान अनुकूल असते. या आंब्याचे वजन सुमारे 350 ग्रॅम आहे असते. मियाझाकी आंबा जपानमध्ये तैयो-नो-टोमागो या नावानेही ओळखला जातो. हे आंबे पिकल्यावर जांभळे आणि लाल दिसतात. या आंब्यांची चव ही अतिशय गोड आणि स्वादिष्ट असते. हा आंबा अतिशय रसाळ असतो.
किती आहे किंमत?
जागतिक बाजारात मियाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे या आंब्याची शेती करणारे शेतकरी या आंब्याच्या झाडाची सुरक्षा करतात. हा आंबा महाग असल्याने सर्वसामान्य व्यक्ती हा आंबा विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे श्रीमंत आणि हौसी लोक हा आंबा खातात. महत्यावाची बाब म्हणजे हे आंबे बाजारात विकले जात नाहीत, यांचा लिलाव केला जातो. भारतातील रायपूर आणि सिलीगुडी येथे झालेल्या आंबा महोत्सवात मियाझाकी आंबा प्रदर्शनाला ठेवण्यात आला होता. त्यामुळे या आंब्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.