मोबाईलच्या जमान्यात अनेकांना एकमेकांशी फेस टू फेस बोलण्यात वेळ नाही. बहुतेक लोक चॅटिंगवरच एकमेकांशी बोलतात. असेच दोन तरुण जे दिवसभर चॅटिंग करायचे.
चॅटिंग करूनच त्यांनी ते करोडपती बनले. तब्बल 30 कोटी रुपये त्यांनी कमावले आहे. पोलिसांना जेव्हा या तरुणांच्या पैसे कमवण्याच्या पद्धतीबाबत माहिती झाली. तेव्हा त्यांच्या कमाईचा मार्ग पाहून पोलीसही चक्रावले.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे दोन तरुण. एक बँकेत काम करत होता, तर दुसरा बँकेत नुसता चकरा मारत होता. इतकंच काम करून दोघंही ऐशोरामात आयुष्य जगत होते. या दोघांनी 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या खात्यात 6 कोटी रुपये सापडले. हे तरुण सोशल साइट्सवर जास्त असायचे. टेलिग्रामवर लोकांचे ग्रुप तयार करायचे आणि त्यांच्याशी चॅटिंग करत राहायचे. त्यांचा पगारही तितका नव्हता मग त्यांच्याकडे इतके पैस आले कसे, असा प्रश्न पोलिसांनीही पडला.
या तरुणांवर पाळत ठेवणाऱ्या विंग कमांडरने 23 फेब्रुवारीला आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाच्या तपासासाठी आग्रा पोलीस या तरुणांपर्यंत पोहोचले. डीसीपी सूरज राय म्हणाले, ’23 फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये फिर्यादीने सांगितलं की टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 1.99 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. एसीपी हरी पर्वत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. तपासानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
नेमंक काय करायचे तरुण?
पोलिसांना तरुणाच्या पैसे कमावण्याच्या अनोख्या पद्धतीबद्दल माहिती मिळवली तेव्हा तेसुद्धा आश्चर्यचकित झाले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितलं की, हे लोक सोशल साइट्सवरून लिंक पाठवून लोकांना फसवत असत. हे तरुण मोठे नेटवर्क तयार करून लोकांना फसवायचे आणि नंतर सायबर फसवणूक करून फसवणूक करायचे.
आरोपी हे ॲप देशाबाहेरील सर्व्हरवर होस्ट करायचे आणि त्याद्वारे वेगवेगळ्या सोशल मीडियावर लिंक द्यायचे. त्यानंतर त्या लिंक्सद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. मग ते पैसे म्युल अकाऊंटमध्ये सर्क्युलेट करायचे. याच म्युल अकाऊंटच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. एक बँक कर्मचारी असून दुसरा आरोपी बँकेत खाती उघडायचा.
आरोपींनी कमवले 3 कोटी
पोलीस तपासात तब्बल 42 बँक खाती उघडकीस आली असून त्यात फसवणूक करून पैसे गोळा केले गेले. पोलिसांनी गोठवलेल्या या 42 खात्यांमध्ये 6 कोटींहून अधिक रक्कम पोलिसांना सापडली आहे. त्यांनी आतापर्यंत 25 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. त्यांनी पीडित विंग कमांडर आणि इतरांची 1.99 कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
डीसीपी राय पुढे म्हणाले, ‘आरोपी बाहेरील लोकांशी बोलून काम करून घेत असत. आतापर्यंत 6 कोटी रुपयांची 42 खाती आमच्या निदर्शनास आली आहेत, ती गोठवण्यात आली आहेत. 42 खात्यांमधून अंदाजे 25 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. आरोपींकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीत आणखी काही लोक आहेत, त्यांचीही ओळख पटली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
पोलीस या टोळीतील अन्य गुन्हेगारांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी डीसीपी सिटी सूरज राय यांनी हा खुलासा करणाऱ्या टीमला 25 हजार रुपयांचे रोख बक्षीसही दिलं आहे.