ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत,धनगर समाज सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देणार


अहमदनगर : राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर फसवण्याचा काम केले आहे. अनेक वर्ष झाले (Ahmednagar) धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला आहे. मात्र आजपर्यंतच्या सर्वच सरकारने समाजाची फसवणूक केली आहे.

त्यामुळे आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) धनगर समाज सर्व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देणार; अशी भूमिका यशवंत सेनेच्यावतीने मांडण्यात आली आहे

अहमदनगरमधील चौंडी येथे धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. या बैठकीत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी बाबत मोठे निर्णय घेण्यात आले. आज अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेऊन बाळासाहेब दौलतडे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. धनगर समाज यशवंत सेनेच्या (dhangar Reservation) माध्यमातून राज्यातील १५ ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन उमेदवारी जाहीर करणार; अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली आहे.

आजपर्यंत सत्तेत आलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाविषयी वेळोवेळी फसवणूक केली. तसेच राज्यातील कोणत्याच पक्षाने धनगर समाजातील उमेदवारांना लोकसभेबाबत विचारात घेतले नाही. अथवा त्यांना उमेदवारीही जाहीर केली नाही. ज्या ज्या ठिकाणी धनगर समाज निर्णायक भूमिका घेऊ शकतो, त्या ठिकाणीही कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्याने अखेर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही लढाई लढणार असल्याचेही बाळासाहेब दौलतडे यांनी सांगितले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *