राज ठाकरेंकडे शिवसेना जाणार?’कुणाचा पक्ष कुणाकडे जात नसतो, मी शिवसेनेचा किंवा राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. लवकरच महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल 80 टक्के जागावाटप निश्चित झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
शिवसेना राज ठाकरेंच्या ताब्यात जाऊ शकते, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत, त्यावरही देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.
राज ठाकरेंकडे शिवसेना जाणार?
‘कुणाचा पक्ष कुणाकडे जात नसतो, मी शिवसेनेचा किंवा राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही. त्यांच्या महायुतीमध्ये यायच्या चर्चा सुरू आहेत, हे खरं आहे. लवकरच फॉर्म्युला होईल. फॉर्म्युला निश्चित करण्याकरता आलो आहोत’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंना टोला
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे. ‘मी त्यांना टोमणेबहाद्दर ही एकच उपमा दिली आहे. माझी उपमा कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात. देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली ती सार्थ ठरवली पाहिजे म्हणून ते टोमणे मारत असतात. एक वाक्य विकासावर बोला. 25 वर्षात अख्ख्या मुंबईत हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही. मी 10 सांगतो. जेवढे आयकॉनकि प्रोजेक्ट माझ्या काळात सुरू झाले. हे एकही नाही करू शकले. हे विकासावर बोलू शकत नाहीत. अदवातदवा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे, मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे याच्याव्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय आहे? काहीही नाही’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.