Video कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला,जो समोर दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडल्या,150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
रशियामध्ये मनसुन्न करणारी दहशतवादाची घटना घडली आहे. रशियाची राजधानी मॉक्सोमध्ये एका मोठ्या कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला.
जो समोर दिसेल त्याच्यावर गोळ्या झाडल्या. काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये ज्या प्रकारे 26/11 चा हल्ला झाला होता, तसाच प्रकार या ठिकाणी घडला. अजमल कसाब याने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर अंदाधुंद गोळीबार केला होता, तसाच हा प्रकार होता. आतापर्यंत या घटनेमध्ये 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 115 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री क्रोकस सिटी हॉलमध्ये एका रॉक बँडकडून ‘पिकनिक’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं लोक जमली होती. पण अचानक 5 दहशतवादी आले आणि त्यांनी बेछुट गोळीबार सुरू केला. आधी हॉलमध्ये त्यांनी गोळीबार केला. त्यानंतर हॉलमधून बाहेर पडत असताना लोकांवर गोळीबार केला. एवढंच नाहीतर दहशतवाद्यांनी ग्रेनेड सुद्धा फेकले. त्यामुळे घटनास्थळी आग लागली. एका व्हिडीओत 2लोक रायफल्स घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरताना दिसतात. तर असॉल्ट रायफल घेऊन 5 हल्लेखोर कॉन्सर्ट हॉलमध्ये आरडाओरडा करणाऱ्या लोकांवर जवळून गोळीबार करत होते.
Russian Concertgoers who were Inside of the Crocus Concert Hall in Moscow when the Terrorist Attack occurred have stated that the Fire stated when the Gunmen began to throw Molotov Cocktails at the Walls and Ceilings, with it then stating when they tried to Evacuate several of… pic.twitter.com/nlRWcra3qP
— OSINTdefender (@sentdefender) March 22, 2024
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख मुराशको यांनी सांगितलं की, जखमींमध्ये 60 जणांची प्रकृती गंभीर आहे. हल्लेखोरांनी गोळीबार आणि बॉम्बचे स्फोटही घडवून आणले. यामुळे कॉन्सर्ट हॉलमध्ये भीषण आग लागली. या आगीमुळे कॉन्सर्ट हॉलचा छत कोसळलला.
रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध रशियन रॉक बँड ‘पिकनिक’च्या मैफिलीत सहभागी होण्यासाठी लोकांची गर्दी जमली असताना हा हल्ला झाला. या हॉलमध्ये 6,000 हून अधिक लोक बसू शकतात.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशात पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यातील हल्लेखोरांचे काय झाले? याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
आयसीसीने घेतली जबाबदारी
आयसीसीने म्हटलं की, आम्ही मॉस्कोतील एका क्रॉस्नोगोर्स्कमध्ये ख्रिश्चनांच्या मोठ्या सभेवर हल्ला केला. यात शेकडो लोक मारले गेले आणि जखमी झाले. दरम्यान, आयसीसने केलेल्या या दाव्याची सत्यता समोर आलेली नाही. गेल्या काही आठवड्यांपासून आयसीस रशियात सक्रीय झाले आहे. याआधी 7मार्च रोजी रशियाच्या संरक्षण संस्थांनी दावा केला होता की, आयसीसचा एक हल्ल्याचा कट उधळून लावला. काही दिवसांपूर्वी रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की, रशियातील संवेदनशील क्षाग असलेल्या काकेश इथं इंगुशेटियामध्ये गोळीबार केला होता. यात आयसीसच्या 6 जणांना कंठस्नान घातल्याचा दावा करण्यात आला होता. आतापर्यंत हल्लेखोरांबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हल्लेखोरांनी सैनिकांचा पोषाख घातला होता. रशियन माध्यमे आणि टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सतत गोळीबाराचे आवाज येत होते.
युक्रेननं नाकारला हल्ला
दरम्यान, युक्रेनने यामागे आपला हात नसल्याचं स्पष्ट केलंय. युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांनी म्हटलं की, आमच्या देशाने कधीच दहशतवादी पद्धतीचा वापर केलेला नाही.
पंतप्रधान मोदींनी केला हल्ल्याचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हल्ल्याचा निषेध करताना पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मॉस्कोत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. या कठीण काळात भारत रशियाच्या आणि तिथल्या नागरिकांसोबत आहे.