अमेरिकाताज्या बातम्या

राममंदिर रथयात्रा,अमेरिकेच्या 48 राज्यांतील 851 मंदिरांना भेट देणार


सोमवार दि. २५ मार्चपासून अमेरिकेतील शिकागो येथून राम मंदिर रथयात्रेला (Ram Mandir Rath Yatra) सुरुवात होणार आहे. हा प्रवास पुढील ६० दिवसांत आठ हजार मैलांपेक्षा जास्त अंतर कापणार असून ४८ राज्यांतील ८५१ मंदिरांना ही यात्रा भेट देणार आहे.

(Ram Mandir rath yatra to travel 8,000 miles, visit 851 temples in 48 US states)

रथयात्रेचे आयोजन करणारे विश्व हिंदू परिषदेचे अमेरिकेचे महासचिव अमिताभ मित्तल यांनी सांगितले की, टोयोटा सिएना व्हॅनवर बांधलेल्या रथात राम, देवी सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती असतील. अयोध्येच्या (Ayodhya) राम मंदिरातून विशेष प्रसाद आणि अभिषेक केलेला अक्षताचा कलश त्यांच्यासोबत नेण्यात येणार आहे.

अशीच आणखी एक यात्रा कॅनडामध्येही काढण्यात येणार असून या यात्रेत कॅनडातील १५० मंदिरांना भेट दिली जाणार आहे. कॅनडा येथे होणाऱ्या रथयात्रेचे आयोजन कॅनडाच्या विश्व हिंदू परिषदेने केले आहे.

हिंदू टेंपल एम्पॉवरमेंट कौन्सिल (एचएमईसी) च्या तेजल शहा म्हणाल्या, या रथयात्रेचा उद्देश लोकांना हिंदू धर्माबद्दल जागृत करणे, शिक्षित करणे आणि सशक्त करणे हा आहे. ही यात्रा सर्व हिंदूंना एकत्र येण्याची संधी देत ​​आहे. जगभर हिंदू धर्माची जनजागृती आणि प्रसार करण्याच्या मोहिमेत आपण आणि आपल्या भावी पिढ्यांनी एकत्र येणे खूप महत्त्वाचे आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी सांगता –
विश्व हिंदू परिषदेचे अमेरिकेचे सरचिटणीस अमिताभ मित्तल यांनी सांगितले की, या यात्रेचे नियोजन आणि आयोजन करण्यासाठी अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच हिंदू समाजाकडून अशा प्रकारची यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेची सांगता २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी होणार आहे. रथयात्रेदरम्यान मोठ्या मंदिरांनाच नव्हे तर छोट्या मंदिरांनाही भेट दिली जाणार आहे. अमेरिकेतील जवळपास सर्व हिंदू मंदिरांना भेट दिली जाईल, असे ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *