मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांला अटक करण्यात आली आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.
Delhi Court reserves order on Chief Minister Arvind Kejriwal's remand in the excise policy case.
ED has sought 10 days of custody for him. Order will be passed shortly. #ArvindKejriwal #ED https://t.co/6oOtWuHCKw
— Live Law (@LiveLawIndia) March 22, 2024
ईडीच्या टीमने आज अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.
ईडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आज देशभरात निदर्शने करत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवस कोठडीची मागणी ईडीने केली. दरम्यान कोर्टाना निर्णय राखून ठेवला आहे