ताज्या बातम्याबीड जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

पंकजाताई बीडमधून जिंकणार !महाराष्ट्रातील ‘एवढ्या’ जागा, कोण कुठे जिंकणार ही आहे संपूर्ण यादी !


अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत गेला आहे.पण त्यांच्यातलाच एक नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेला आहे. या नेत्याला थांबवणे त्यांना जमले नाही. बीड जिल्ह्यातील मतांची स्थिती थोडी वेगळी आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास सगळेच बडे नेते आमच्या बाजूने आहेत. पण नेते एका बाजूने आल्यानंतर मतं बदलतात का? हे पाहण्यासाठी मी उत्सूक आहे, असे मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये अवघ्या देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलं आहे. कारण ज्या पद्धतीने 2022 साली येथील सरकार पडलं त्यानंतर सगळी राजकीय गणितं बदलून गेली आहेत.

अशावेळी भाजपला आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार याबाबत आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. असाच अंदाज . India Tv- CNX ओपिनियन पोलमध्येही वर्तवण्यात आला आहे. (india tv cnx maharashtra opinion poll shiv sena ubt thackeray group to win total 8 seats in maharashtra see the full list lok sabha election 2024)

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाराष्ट्राची सत्ता काबिज केली होती. तर 2022 साली एकनाथ शिंदेंना हाताला धरून भाजपने शिवसेनेत बंड घडवून आणलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. पण त्यांना तेवढाच फटका बसला नाही. तर त्यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ते या सगळ्या राजकारणात गमावून बसले. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन जनतेसमोर जावं लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे गटाच्या पारड्यात किती जागा टाकतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये भाजप मोठं यश मिळवेल असा अंदाज आहे. पण भाजपपाठोपाठ सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा असेल असा अंदाज आहे.

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची शिवसेनेची युती होती. ज्याचा फायदा त्यांना झाला होता. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने 18-18 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता झालेल्या फुटीचा फटका हा शिवसेना (UBT)ला बसू शकतो असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (UBT) महाराष्ट्रात फक्त 8 जागाच जिंकू शकेल असा अंदाज आहे.

इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. India TV-CNX च्या ओपिनियन पोलनुसार, यंदाच्या निवणडुकीत राज्यात 48 पैकी 8 जागा या शिवसेना (UBT)ला मिळतील. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाकरेंना बराचसा फटका बसताना दिसत आहे.

शिवसेना (UBT)महाराष्ट्रातील कोणत्या जागा जिंकणार?, काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज

1. हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2. शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
4. धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
5. छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
6. परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
7. नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
8. मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष मारणार बाजी?

मुंबई उत्तर – भाजप
मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व – भाजप
मुंबई उत्तर मध्य – भाजप
मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना
मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
नंदूरबार -भाजप
धुळे – भाजप
जळगाव -भाजप
दिंडोरी -भाजप
नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बुलढाणा – शिवसेना
अकोला – भाजप
अमरावती – भाजप
वर्धा – भाजप
रामटेक – काँग्रेस
नागपूर – भाजप
भंडारा-गोंदिया – भाजप
गडचिरोली चिमूर -भाजप
चंद्रपूर – भाजप
यवतमाळ वाशिम – शिवसेना
हिंगोली – काँग्रेस
नांदेड – भाजप
परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जालना – भाजप
छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
लातूर – भाजप
बीड – भाजप
पालघर – भाजप
भिवंडी – भाजप
कल्याण – शिवसेना
ठाणे – शिवसेना
रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पुणे – भाजप
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस
शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
अहमदनगर – भाजप
शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सोलापूर – भाजप
माढा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
सांगली – भाजप
सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस
हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *