क्राईमताज्या बातम्या

राजकीय वर्तुळात खळबळ, ‘मफलर असलेला आत गेला, आता गळ्यात पट्टा असलेला आत जाईल.’ हा आहे कोण?


दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना गुरवारी रात्री अटक केली. केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आम आदमी पार्टी (आप) सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहे. तर भाजप नेत्यांकडून यावर प्रतिउत्तर दिले जात आहे.

दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करत पुढील अटकेची शक्यताही वर्तवली आहे. ट्विट करताना नितीश राणे यांनी काही हावभावांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा उल्लेख करत पुढील अटकेबाबत सांगितले आहे. त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतलेले नाही. राणेंनी ट्विट करून म्हटलं, ‘मफलर असलेला आत गेला, आता गळ्यात पट्टा असलेला आत जाईल.’ यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने रस्त्यावरून न्यायालयापर्यंत लढण्याची घोषणा केली आहे. ईडी आज केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे. अटकेपूर्वीच आम आदमी पक्ष गुरुवारी संध्याकाळी उशिरा सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी पक्षाने केली.

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून लोकशाहीचे रक्षण करण्याची आशा असल्याचे म्हटले आहे. आतिशी यांनी केजरीवाल यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *