पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला अन पुढ काय घडल ?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा अद्याप सुरूच आहे. अंतरवाली सराटी इथं २४ मार्चला मनोज जरांगे पाटील बैठक घेणार असून या बैठकीत मराठा समाजाच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय होणार आहे.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आदर्श आचारसंहितेचे पालन करून 900 एक्कर वर मराठा समाजाची सभा घेण्यावर ठाम असून लोकशाही मार्गाने ही सभा घेणार
बैठकीनंतर ९०० एकर परिसरात सभेचे आयोजन केले आहे. या सभेची तयारीही केली जात असून लवकरच तारखेची घोषणा होणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचा खुलासा केला आहे. पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहाटे तीन वाजता फोनवर बोलण झाल्याची कबुली पाटील यांनी दिली. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे सुरूच आहे. त्यामुळे एकीकडून विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे ही गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असे देखील जरांगे सुनावलं.