अवैध दारुविक्री करणाऱ्या एका ठिकाणावर छापा,मात्र हाती काहीच नं लागल्यामुळे त्यांना गावात एका ठिकाणी भजे खाऊन परतण्याची वेळ
कोल्हार : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात देशी दारूची अवैध विक्री सुर असून, अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. आज भल्या सकाळी पोलीस गाडीतून आलेल्या अधिकाऱ्यांनी फिल्मीस्टाईल गावात प्रवेश करत अवैध दारुविक्री करणाऱ्या एका ठिकाणावर छापा टाकला, मात्र हाती काहीच नं लागल्यामुळे त्यांना गावात एका ठिकाणी भजे खाऊन परतण्याची वेळ आली.
गेल्या अनेक काळापासून राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे देशी दारूच्या अवैध विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरूआहे. गावातील गल्लीबोळासह जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, सार्वजनिक धार्मिक स्थळे या देशी दारूच्या विळख्यात अडकलेली असताना गावातील मोठा तरुण वर्ग दारूच्या आहारी गेला आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी एका तरुणाचा दारूच्या अति सेवानामुळे मृत्यू झाला असून, अनेकांचे संसार दारुमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकदा राहुरीचे पोलीस गावात चकरा मारून या व्यावसायिकांना भेटून जातात, मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत.
याचदरम्यान दि.९ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्याच्या दरम्यान गावठाण हद्दीतील दत्त मंदिरासमोर पोलीस गाडीतून आलेल्या पथकाने फिल्मीस्टाईल एंट्री मारली. अवैध दारू विक्री होत असलेल्या ठिकाणावर छापा मारला, मात्र या व्यावसायिकाच्या गुप्तहेरामुळे या पथकाच्या हाती काही लागले नाही. गावातील काही जबाबदार पदाधिकाऱ्यांना सदर ठिकाणी बोलावून घेत पाहुणचार घेऊन या पथकाला माघारी परतावे लागले. त्यामुळे या कारवाईमध्ये तडजोड झाल्याची चर्चा गावात सुरूहोती.
गावात खुलेआम दारूची सुरू
गावात सत्तास्थापन केलेल्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक, राहुरी पोलीस निरीक्षक यांचे उंबरठे झिजवून गावातील अवैध धंद्यावर आळा घालण्याची मागणी केली होती. मात्र, येथे देखील काही तडजोडी झाल्यामुळेच गावातील दारू विक्री खुलेआम सुरू असल्याची चर्चा गावातून होत आहे.