ताज्या बातम्या

पाकिस्‍तान राष्‍ट्राध्‍यक्षपदी आसिफ अली झरदारींची निवड


पाकिस्‍तानच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदी आज (दि. ९ मार्च) पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची निवड झाली. झरदारी हे पाकिस्‍तानच्‍या (Pakistan’s president Election) राष्ट्राध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवडून येणारे पहिले नेते ठरले आहेत.

ते पाकिस्‍तानच्‍या दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत. त्‍यांच्‍या पक्षाने पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) नेतृत्वाखालील आघाडी सरकारला समर्थन दिले आहे. ( Asif Ali Zardari elected Pakistan’s president for a second time )

Pakistan’s president Election : ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली

पाकिस्‍तानमध्‍ये ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक झाली. कोणत्‍याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. आसिफ अली झरदारींच्‍या ‘पीपीपी’ने नवाज शरीफ यांच्‍या ‘पीएमएल-एन’ पक्षाचे पंतप्रधानपदाच्या उमेदवार शेहबाज शरीफ यांना पाठिंबा दिला होता. आता राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत झरदारींना ‘पीएमएल-एन’चे समर्थन मिळाले. राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत झरदारी यांना पश्तूनख्वा मिल्ली अवामी पार्टीचे (पीकेएमएपी) प्रमुख महमूद खान अचकझाई यांनी आव्हान दिले होते. सुन्नी इत्तेहाद कौन्सिलसह (एसआयसी) इम्रान खान यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे त्‍यांना समर्थन होते.

बेनझीर भुट्टो यांच्‍या हत्‍येनंतर झरदारी राजकारणात सक्रीय

बेनझीर यांची २००७मध्‍ये हत्‍या झाली. यानंतर झालेल्‍या निवडणुकीत झरदारींच्‍या ‘पीपीपी’ला घवघवीत यश मिळाले. यानंतर ते पाकिस्‍तानचे राष्‍ट्राध्‍यक्ष झाले होते. तर त्‍याचे पुत्र बिलावल झरदारी भुट्टो परराष्ट्रमंत्री बनले होते. झरदारी यांनी यापूर्वी 2008 ते 2013 या काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. आता निवडणुकीनंतरच्या नव्या सत्तासमीकरणात झरदारी अध्यक्ष होत असले, तरी खरी सूत्रे लष्कराच्या ताब्यात असतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *