ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरले आता जरांगेंचा सरकारला इशारा


मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरले आहे. उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्ब्येत खालावली होती, त्यामुळे ते आता विश्रांती घेत आहेत.

आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. ‘फडणवीस यांचा महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव आहे. एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही’ असं जरांगे पाटलांनी म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे असा आरोपही जरांगेनी केला. पुढे बोलताना जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे, ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेउयात.

8-9 मार्चपर्यंत तारखेपर्यत वाट बघणार अन्यथा…

लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी प्रश्न विचारला असता मनोज जरांगेंनी म्हटले की, माझा राजकीय अजेंडा नाही, कोणीही फॉर्म भरू शकतो, सर्वाना आमदार खासदार व्हावं वाटत. पण मी राजकारणात पडणार नाही, मी समाजाचा मालक नाही. 8-9-तारखेपर्यत वाट बघणार आहोत, नंतर आंदोलन करणार आहे.

मराठ्यांना गुंतवण्याचा सरकारचा डाव

सरकारने गुन्हे दाखल करण्याचा नवीन डाव सुरू केलाय, सरकारचा हा शेवटचा डाव आहे. चार महिन्यांपूर्वी गुन्हे दाखल केलेल्या तरुणांना अटक केली जात आहे. गृहमंत्री पोलिसांचे कान फुकत आहेत. मराठ्यांना गुंतवण्याचा सरकारचा हा डाव आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मनात मराठ्यांच्या विरोधातील द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. पोलीस बोर्ड काढत आहेत असा आरोपही मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांवर केला.

दरम्यान, शुक्रवारी रात्री अचानक जरांगे पाटलांची प्रकृती खालावली होती. मनोज जरांगे यांच्या अचानक छातीत दुखत होतं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले व त्यांनी जरांगे पाटलांवर उपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे मराठा बांधवांना चिंता लागली होती. कारण यापूर्वी त्यांच्या छातीत कधीही दुखत नव्हतं. मात्र जरांगे पाटलांवर उपचार केल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र छातीत कशामुळे दुखत आहे, याची माहिती पुढील उपचारानंतर कळेल. त्यामुळे त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हलवावे लागेल संभाजीनगरला हलवावे लागेल असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *