निवडणुकीचा प्रचार सुरु होण्याच्या आधी एक ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. ज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र असे असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोग तारखा जाहीर करू शकते. सध्या हाती आलेल्या पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या याआधी आलेल्या ओपिनियन पोलच्या उटल सर्वात धक्कादायक असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा महायुतीला तर ३ जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल, असे सांगितले जात आहे. अजून त्यांचे जागा वाटप झाले नाही.
तसेच या पोलमध्ये राजधानी नवी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र येऊन सुद्धा येथील सात पैकी सात जागांवर पुन्हा एकदा भाजप बाजी मारेल, असे चित्र आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचा फायदा एनडीएला मिळेल.
तसेच बंगालमध्ये ममता बॅनर्जीची जादू कायम असेल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या याआधी आलेल्या ओपिनियन पोलच्या उटल सर्वात धक्कादायक असा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. यामुळे मतदानाच्या आधी काय समीकरण बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सध्या भाजपने अनेक नेत्यांना फोडून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र, बिहारमध्ये देखील अनेकांना गळाला लावले आहे. यामुळे ही निवडणूक भाजपसाठी सोप्पी जाईल असेही म्हटले जात आहे.