उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समस्त ब्राम्हण समाजाबद्दल द्वेषपुर्ण वक्तव्य,मनोज जरांगेवर कठोर कारवाई करा…
आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व समस्त ब्राम्हण समाजाबद्दल द्वेषपुर्ण वक्तव्य केले.
त्या बद्दल ब्राम्हण समाज व इतर नागरिकानी निषेध व्यक्त केला असून, या प्रकरणी शासनाने जरांगेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंगरुळनाथ येथील ब्राम्हण समाज संघाचे वतीन प्रविण घोडचर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मनोज जरांगे यांच्या द्वेषपुर्ण वक्तव्यामुळे जातीय तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्था धोयात आली आहे. तसेच सलोख्याचे वातावरण बिघडत आहे, असे निवेदनात नमुद आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी व पोलिस प्रशासनास दिले आहे. निवेदनावर ब्राम्हण सेवा समितिचे सदानंद जहागीरदार, मुकुंद दंडे, प्रमोद घोडचर, गजानन सरजोशी, मकरंद महाजन, अभिषेक दंडे, शरद बंगाळे, राहुल पांडे, नितीन महाजन, मुकुंद कुळकर्णी, अभिषेक कुळकर्णी, वैभव वेद्य, श्रीपाद जहागीरदार, उज्वल मिश्रा, अजित देशमुख, सुमित डावरे, राम वैद्य, जयश्री दयाळ, राधिका सरजोशी, उज्वला घोडचर, अनिता कोरान्ने, गिरिष घोडचर, विशाल सांगोळे, गणेश राऊत, मकरंद देशमुख, राजेश्वर पांडे, नरेंद्र रघुवंशी, राजेंद्र गिरधर, संघवी, मिलिंद पांडे,प्रशांत पिंपरकर,प्रबोध महाजन, विवेक सरजोशी, ब्राम्हण समाजाच्या सदस्यासह इतर समाजाच्या नागरिकांच्या स्वाक्षर्यांना आहेत.