ताज्या बातम्या

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?


महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या ७५ वर्षांपर्यंत, तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला ६५ व्या वर्षांपर्यंत सहा महिने मोफत पासची सुविधा देण्यात आली आहे.

याबाबत महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांच्या स्वाक्षरीचे सुधारित परिपत्रक नुकतेच निर्गमित झाले आहे.

सप्टेंबर ते फेब्रुवारी या महामंडलाच्या ऑफ सिझनमध्ये सवलतीचा हा लाभ घेता येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवास पासबाबत सुधारित परिपत्रकीय सूचना काढण्यात आल्या होत्या.मात्र, या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रतास पासबाबत सधारित परिपत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.

यात महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवत्ती घेतलेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे वयाच्या ७५ वर्षांपर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार आहे.तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत दरवर्षी सलग ६ महिन्यांकरिता मोफत प्रवास पास देण्यात येणार आहे

यापूर्वी सेवानिवृत्त व अपंग कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा व विधूर यांना वर्षातून केवळ एक महिन्याचा मोफत प्रवासचा पास मिळत होता. मात्र, आता सर्वाना सरसकट सहा महिने मोफत पासची सुविधा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा राज्यातील १० हजारपेक्षा अधिक सेवानिवृत्त/ मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना लाभ होणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *