मराठा समाजाला आरक्षण हवे असले, तरी जरांगे पाटलांच्या तोंडची ही शिवराळ भाषा मराठा समाजाला मान्य आहे का?
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे – फडणवीस सरकारने दमदार पावले टाकल्यानंतर देखील उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या तोंडी शिवराळ भाषा आली. उपोषण स्थळी त्यांना भेटायला गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर जरंगे पाटलांनी छगन भुजबळांच्या नावाने शिव्या देऊन सरकारवर धमकी भरली भाषा वापरली.
तुम्ही आम्हाला जगू देणार नसाल, तर आम्ही पण तुम्हाला राज्यभरात जगू देणार नाही. ते तिरक्या डोळ्याचं आयघालं… छग्या टंगार झ*… त्याच्या नादी लागून सगळं राज्य भेटीस धरलं तुम्ही…. भंगार झ*… सगळ्या दुनियेचं ते टांगार झ*… त्याचा नादी लागलात तर सगळ्या राज्याची राख रांगोळी होईल. त्याचं ऐकून कशाला काडी लावता तुम्ही??, अशा शिव्या जरांगे पाटलांनी जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासमोर दिल्या.
मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा चौथा दिवस होता. त्यांच्या नाकातून रक्त आल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण त्याचवेळी त्यांनी डॉक्टरी उपचार करून घ्यायलाही नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ त्यांना आज भेटायला गेले, त्यावेळी त्यांच्यासमोर जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचे नाव घेऊन त्यांना शिव्या दिल्या. त्या शिव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण हवे असले, तरी जरांगे पाटलांच्या तोंडची ही शिवराळ भाषा मराठा समाजाला मान्य आहे का??, असा परखड सवाल केला.