pakistan : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हजारो बलुचांनी निदर्शने केली तेव्हा त्यांना लाठीचार्जचा सामना करावा लागला.
एवढेच नाही तर पोलिसांनी महिला आणि लहान मुलांनाही पाठलाग करुन मारले. शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले, मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सोडण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतलेल्या महिला आणि त्यांच्या मुलांना सोडण्यात आल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे. मात्र, हे प्रकरण अजून संपले नसून इस्लामाबादच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने बलुच ट्रक घेऊन बसले आहेत.
बलुचांना पाकिस्तानचा इतका राग का आला, त्यांनी 1600 किलोमीटरचा मोर्चा काढला
दरम्यान, 1947 च्या काळात बलुचिस्तानवर कलात खान यांचे शासन होते, ज्यांना पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची इच्छा नव्हती. मोहम्मद अली जिना यांनी त्यावेळी त्यांना बलुचिस्तानच्या स्वायत्ततेचे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. आता बलुचिस्तान हा पाकिस्तानचा प्रांत आहे. विशेष म्हणजे, संसाधनांनी हा प्रांत समृद्ध आहे. मात्र हीच संसाधने पाकिस्तान आता चीनच्या हवाली करत आहे. आपल्या संस्कृती, भाषा आणि समुदायावर होणाऱ्या हल्ल्याची जाणीव असलेले बलुच त्याविरोधात सातत्याने आंदोलन करत आहेत. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांत बलुचांवर अत्याचारही वाढले असून त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
कोण आहे मोला बख्श, ज्याच्या हत्येने लोक संतापले?
दुसरीकडे, 23 नोव्हेंबर रोजी बालच मोला बख्श नावाच्या तरुणाच्या हत्येने नुकताच मोठा भडका उडाला. मोला बख्श हा लोकसंगीताशी निगडित कुटुंबातील सदस्य होता, ज्याची सुरक्षा दलांनी हत्या केली. त्यामुळे बलुच लोकांमध्ये नाराजी आहे. गेल्या अनेक वर्षांत बलुचांच्या बेपत्ता आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा स्थितीत मोला बक्श याच्या हत्येने त्यांचा संताप आणखी वाढला. यानंतर बलोच लोकांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत 1600 किलोमीटर लांब लॉंग मार्च काढला. या मार्चला जनतेचा कसा पाठिंबा होता, यावरुनही या आंदोलकांचे स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावर उभे राहून फुलांचा वर्षाव करत होते, यावरुन समजू शकते.
लोक इतके का चिडले?
दरम्यान, मोला बख्शला बलुचिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने 20 नोव्हेंबरला अटक केली होती. तो व्यवसायाने शिंपी होता. मोला बक्श याच्याकडून स्फोटके जप्त केल्याचा आरोप आहे. 21 नोव्हेंबर रोजी मोला बख्शला न्यायालयात हजर करण्यात आले, मात्र 23 रोजी झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांसोबत चकमक झाल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. यावेळी मोला बख्श मारला गेला. तर मोलाचे कुटुंब आणि बलुच संघटनांचे म्हणणे आहे की, त्याला बनावट चकमकीत मारण्यात आले.
दुसरीकडे, या हत्येमुळे संतप्त झालेल्या मोला बख्शच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन निषेध केला. सुमारे आठवडाभर मोठा जमाव मृतदेह घेऊन मोकळ्या आकाशाखाली रस्त्यावर बसला होता. अखेर 29 नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्या दबावामुळे त्याला दफन करण्यात आले, मात्र काउंटर टेररिझम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने लोक संतप्त झाले. या घटनेनंतर संताप इतका वाढला की बलुचांनी पुन्हा 1600 किलोमीटरचा मार्च काढला आणि इस्लामाबादलाच वेढा घालण्याचा निर्णय घेतला. या बलुचांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी लोक जमले होते आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे. काउंटर टेररिझम विभागाकडून शस्त्रे हिसकावून घेण्यात यावी आणि जे बेपत्ता आहेत त्यांना सोडण्यात यावे, अशी बलुचांची मागणी आहे.