ताज्या बातम्या

एनआयएची चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी


राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी चार राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. NIA च्या पथकांनी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.

दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरणात एनआयएचे पथक एकाच वेळी छापे टाकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने एकट्या कर्नाटकातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत. यापूर्वी 13 डिसेंबर रोजी NIA ने दहशतवादी कट प्रकरणी बंगळुरूमध्ये अर्धा डझनहून अधिक ठिकाणी शोध घेतला होता.

दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संशयावरून संशयितांच्‍या ठिकाणी शोधमोहीम सुरूच आहे. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या 15 दहशतवाद्यांना 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध भागातून अटक केल्यानंतर अजूनही शोध सुरू ठेवण्यात आला होता. त्यानंतर एनआयएच्या पथकाने पुणे, मीरा रोड, महाराष्ट्रातील ठाणे आणि कर्नाटकातील बेंगळुरूसह अन्य 44 ठिकाणी छापे टाकले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *