भारतात लागण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी आनंद तर सारखाच व्यक्त केला जातो. सर्वच लग्नांमध्ये डिजेचा चाल धरत सर्वजण थिरकत असतात. यामध्ये काही व्यक्ती पैशांची उधळण देखील करतात.
नवरदेव किंवा नवरीच्या अंगावर ओवाळून १०, २०, ५० जास्तीत जास्त १०० ची नोट ओवाळून टाकली जाते. अनेक लग्नांमध्ये हा प्रकार तुम्ही हमखास पाहिला असेल. मात्र लग्नात चक्का ५०० च्या नोटांचा पाऊस झालेलं तुम्ही कधी पाहिलं आहे का?
गुजरातमधील केकरी तालुक्यातील सेवडा अगोल गावातील ही घटना आहे. या गावात माजी सरपंच असलेल्या एका व्यक्तीच्या भाच्याचं लग्न आहे. या लग्नातला हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आलाय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की,नवरदेवाची वरात खाली आली आहे. वरातीला सर्व जण नाचत आनंद व्यक्त करत असतात. अशात कुटुंबातिल काही व्यक्ती गच्चीवर जातात आणि खाली नाचणाऱ्यांवर पैशांची उधळण करतात. बर ते काही हजार पाचशे नाही तर लाखो उपये उधळताना दिसत आहेत.
आकाशात सर्वत्र पैसे उडताना दिसत आहेत. त्यातील एका व्यक्तीच्या हातात तर ५०० रुपयांच्या नोटांची मोठी गड्डी आहे आणि तो व्यक्ती जराही न थांबता हे पैसे खाली उधळत आहे. तसेच खाली असलेली लहान मुलं आणि इतरही काही व्यक्ती हे पैसे गोळा करण्यासाठी एकमेकांवर तुटून पडलेत.