नव्या युगाची शेती बाबत अंबाजोगाईत शेतकरी संघटनेचा परिसंवाद
कडा (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांचा अंबाजोगाई येथे होणाऱ्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने ‘नव्या युगाची शेती ‘ या विषयावर शेतकरी संघटनेच्या वतीने परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.या परिसंवादात कृषी ऊर्जेच्या संभावना या विषयावर डॉ.प्रशांत शिनगारे (पुणे) विचार मांडणार आहेत.तसेच जनुकीय परावर्तित बियाणे विषयावर डॉ.विलास पारखी (ग्रुप लिडर महिको, जालना) नैसर्गिक शेतीचे बलस्थान या विषयावर डॉ.कल्याणराव आपेट (वनस्पती योगशास्त्र, कृषी विद्यापीठ, परभणी) व सेंद्रीय शेतीची मर्यादा या विषयावर दिलीप चव्हाण (जनरल मॅनेजर राजदिप फाँस्पेट इंडिया लि.पुणे) आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.हा परिसंवाद १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ११वा. अंबाजोगाईतील मुकुंदराज सभागृहात होणार आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचा ज्येष्ठ विचारवंत मा.अमर हबीब यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.’नव्या युगाची शेती ‘ या जिव्हाळ्याच्या विषयावरील परिसंवाद आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या सन्मान सोहळ्यात बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदासजी आपेट,युवा प्रदेशाध्यक्ष रामेश्वर गाडे,बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन,अनुरथ काशिद, संतोष गुंड,रहेमान सय्यद, स्वप्नील थेटे, विष्णू मांढरे, रिजवान बेग,सागर बोराटे,शेख अल्ताब,मोहन ओव्हाळ,बंडू अप्पा देवकर,दादा खटके यांनी केले आहे.