दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक, शस्त्रासंह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घातक शस्त्रासंह जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली असून या प्रकरणी नगर तालुक्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिकंदरसिंग शक्तीसिंग ज्युनि.( 38, रा. आलाना, (ब्रुकबॉन्ड जवळ), गेवराई,ता.जि.संभाजीनगर), जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक( 30 वर्षे, रा. आलाना, ब्रुकवान्ड जवळ गेवराई, ता. जि. संभाजीनगर), दलसिंग बालासिंग टाक (19 वर्षे, रा. आलाना बुकबॉन्ड जवळ, गेवराई), शाह अन्सार मंजुर शाह ( 21 वर्षे, रा. चितेगाव, ता. पैठण, जि. संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत खंडाळा गावच्या शिवारात काहीजण घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीने संशयास्पद स्थितीत फिरत आहेत, अशी माहिती मिळाल्याने खंडाळा गावच्या परिसरात या संशयितांचा शोध घेत असताना चारजण हायवेलगत लावलेल्या एका करड्या रंगाचा क्रुझर गाडीमध्ये बसले होते. एकजण अंधाराचा गैरफायदा घेत पळून जाताना दिसला. ही क्रुझर गाडीही नगरच्या दिशेने पळून जात असताना पोलीस व खंडाळा गावचे विकास लोटके व इतर ग्रामस्थ यांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून क्रुझर गाड़ी पुणे हायवेवरील केडगाव बायपास चौकात पहाटे सुमारास थांबविली. गाडीजवळ जाऊन गाडीतील व्यक्तींना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांच्या गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ विविध प्रकारचे लोखंडी पान्हे, लोखंडी रॉड, कोयते, स्क्रु ड्रायव्हर, रस्सी, लोखंडी साखळी, बिळा, लोखंडी पाईप, लोखंडी हुक पाईप, असा 5 लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.आरोपींवर 4 गुन्हे दाखल आहेअशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली
ही कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे, अंमलदार संतोष लगड,कैलास इथापे,आनंद घोडके,सोमनाथ वडणे,संभाजी बोराडे,विक्रांत भालसिंग,विशाल टकले, चालक विकास शिंदे. होमगार्ड भाऊसाहेब पवार यांच्या पथकाने केलेली आहे.