ताज्या बातम्या

Video:बापरे ! सूर्याचा मोठा भाग तुटल्याने पृष्ठभागावर वादळ


जगभरातील अवकाश संशोधकांना भूरळ पाडणारा तारा म्हणजे सूर्य. सूर्यावर गेली अनेक वर्षं सातत्याने संशोधन सुरू आहे. सूर्यासंदर्भात नव्यानेच एक घटना नोंदवली गेली आहे.

सूर्याचा काही भाग पृष्ठभागापासून तुटून त्यातून मोठे वादळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. नासाच्या James Webb या टेलेस्कोपने ही घटना टिपली आहे.

अवकाश संशोधक डॉ. तिमिता स्कोव्ह यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सौरवादळं येत राहातात, आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरही होत असतो. त्यामुळे या घटनेचा पृथ्वीवर काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास संशोधक सध्या करत आहेत.

 

स्कोव्ह म्हणतात, ‘सूर्याच्या उत्तर भागातील मटेरियल बाजूला झाले आहे आणि त्यातून Polar Vortexची निर्मिती झाली असून ते सूर्याच्या उत्तर ध्रुवावर फिरत आहे. याचा वेग सेकंदाला ९६ किलोमीटर इतका असेल.’
यूएस नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्चचे संशोधक स्कॉट मॅकिनटोश गेली काही वर्षं सातत्याने सूर्यावर संशोधन करतात. त्यांनी या प्रकारची घटना पहिल्यांदाच पाहिल्याचे म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *