विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे विचार आत्मसात करावे – प्राचार्य वाघुले
आष्टी प्रतिनिधी – आजचे युग हे संगणकाचे युग असून या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास खेळ नवनवीन तंत्रज्ञाना बरोबरच गुरुजनांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थांनी अभ्यासाबरोबरच संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या थोर महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ भगवानराव वाघुले यांनी केले. ते शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘युवकांचा ध्यास ग्रामशहर विकास’ शिबिराचे उद्घाटन सोमवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी चिंचेवाडी येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या वर्षा माळी, सरपंच रामकिसन ठोंबरे, प्राचार्य भगवानराव वाघुले, उपप्राचार्य कैलास वायभासे, मुख्याध्यापक दानवे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामकिसन ठोंबरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील सुनील वायभासे, तलाठी अशोक सुरवसे, ग्रामसेवक प्रसाद आरू, अशोक लवांडे, युवराज वायभासे, अश्विनी वायभासे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा डॉ कैलास वायभासे तर सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ उस्मान खान पठाण, प्रा बाळू बोराडे यांनी केले तर आभार प्रा अंजना गिरी यांनी मानले.
सदरील शिबिर हे सोमवार दिनांक ६ ते १२ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले असून रविवारी समारोप होणार आहे.या शिबिरात प्रा राम बोडखे, प्रा ज्ञानेश्वर अम्रित, प्रा सुभाष नागरगोजे, सुभाष भादवे सर यांचे व्याख्यान तर ईश्वर गव्हाणे, सुभाष थोरवे यांचा भरुडाचा कार्यक्रम तर शनिवारी नामवंत कवी प्रा सय्यद अल्लाउद्दीन, प्रा अभय शिंदे, नागेश शेलार, युवराज वायभासे, हरीश हतवटे, अशोक उढाणे, इंद्रकुमार झांजे, कवयत्री नजमा शेख, संगीता होळकर यांचे कविसंमेलन होणार आहे.