छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्या

जयदत्त क्षीरसागरांचा शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा


पदवीधर (Graduates ) आणि शिक्षक ( Teachers) मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी काल दिवसभर सभा, मेळावे आणि गाटीभेटींवर भर दिला. या निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (30 जानेवारी 2023) मतदान होणार आहे.


ओबीसीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत अखेर भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे.
यावरुन जयदत्त क्षीरसागर यांची भाजप सोबतची जवळीकता वाढत असल्याचं दिसत आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने किरण पाटील (Kiran Patil) यांना उमेदवारी दिली आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळेंना (Vikram Kale) मोठा धक्का मानला जात आहे.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात माजी मंत्री आणि शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले नेते जयदत्त क्षिरसागर हे नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होते. मात्र, अखेर शेवटचा क्षणी क्षीरसागरांनी आपला पाठीबा भाजप उमेदवार किरण पाटील यांना दिला आहे. अधिकृत दिल्याचे जाहिर केल्याने राष्ट्रवादी उमेदवार विक्रम काळेंना हा फार मोठा धक्का बसणार. दरम्यान भाजपा निवडणुक प्रभारी राणाजगजितसिंह पाटील यांनी बीडमध्ये येऊन क्षीरसागरांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक, संस्था चालकांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर उपस्थीत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *