क्राईमताज्या बातम्या

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा भाऊ दिड तास तडफडत राहिला? मृत्यूनंतर हळहळ


नातेवाईकांचा संताप पाहता त्यांना रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं लिहून द्यावं लागलं. रुग्णालयाचे अधीक्षक आले तेव्हा नातेवाईकांनी त्यांनाही घेराव घातला होता. अधीक्षकांनाही या संतापाचा सामना करावा लागला. रोष पाहता रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सायंकाळी ड्युटीवर असणाऱ्या व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणारे विद्यार्थी डॉ. विनय कुमार आणि ज्युनिअर निवासी डॉ. आदित्य वेद्वय यांना निलंबित केले. लेखी तक्रार प्राप्त झाल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपअधीक्षकांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

छातीत वेदना होत असल्याने केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे धाकटेभाऊ निर्मल चौबे यांना बिहारमधल्या भागलपूरमधल्या मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; पण डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी बराच गोंधळ घातला.

दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी केली. त्यानंतर दोन डॉक्टर्सना निलंबित करण्यात आलं. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

निर्मल चौबे यांच्या छातीत वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना मायागंज रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये उचार सुरू होते; पण बराच वेळ तिथले डॉक्टर आलेच नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला. अचानक निर्मल यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत कळताच नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आयसीयूमध्ये ड्युटी असताना दोन डॉक्टर तिथं हजर नसल्याचा आरोप करण्यात आला.

याबाबत बोलताना निर्मल यांचे पुत्र नीतेश चौबे म्हणाले, की शुक्रवारी (27 जानेवारी) सायंकाळी चार वाजता त्यांच्या वडिलांच्या छातीत प्रचंड वेदना होत होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यांना तत्काळ डॉ. एम. एन. झा यांच्या युनिटमध्ये भरती करण्यात आलं. तिथं गेल्यानंतर डॉक्टरच उपलब्ध नव्हते. नंतर दुसऱ्या एका डॉक्टरने निर्मल यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *