ताज्या बातम्या

“मला फार लाज वाटत आहे पण मी…”;शाहाबाज शरीफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल


पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था सध्या सर्वात वाईट स्थरावर आहे. स्टेट बँक ऑफ फाकिस्तानकडे परदेशी चलन जवळजवळ संपलं आहे. पाकिस्तानच्या लोकांकडे दोन वेळेच्या जेवणासाठी आणि वीज ऊर्जेसारख्या रोजच्या वापरातील गोष्टींसाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये गव्हाचं पीठ मिळवण्यासाठीही मारामारी सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानच्या गरिबीबद्दल बोलतानाचा पंतप्रधान शाहाबाज शरीफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानमध्ये मागील अनेक आठवड्यांपासून आर्थिक संकटाची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. अगदी वीजपुरवठ्यापासून ते लग्नाच्या हॉलपर्यंतच्या अनेक गोष्टींबद्दल काटकसर करण्याची वेळ सरकारवर आली आहे. असं असतानाच आता पंतप्रधानांचाच (Pakistan PM) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याचा उल्लेख करत आपण मजबूर असल्याचं सांगितलं. शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी युएईच्या पंतप्रधानांकडून कर्ज मागितलं होतं. कर्ज मागताना लाज वाटत होती असंही शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

शाहबाज यांनी पाकिस्तानच्या वजीर-ए-आजम म्हणून मला युएईमध्ये ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला त्याचा उल्लेख करणं गरजेचं असल्याचं सांगत आपल्या अनुभव कथनाला सुरुवात केली. शाहबाज काही आठवड्यांपूर्वीच युएईच्या दौऱ्यावर गेले होते. जिनेव्हामधील क्लायमेट समिटमध्ये सहभागी झाल्यानंतर ते सौदी अरेबिया आणि नंतर युएईला गेले होते. पाकिस्तानच्या वाईट आर्थिक परिस्थितीबद्दल यावरुनच अंदाज येतो की तिन्ही जागी पाकिस्तानी पंतप्रधान कर्ज मागायला गेले होते. सौदी अरेबियाने दोन आणि युएईने एक अब्ज डॉलर गॅरंटी डिपॉझिट देण्याचा शब्द पाकिस्तानी पंतप्रधानांना दिला.

“दोन दिवसांपूर्वी युएईवरुन आलो आहे. जिथले जे सरदार (राष्ट्राध्यक्ष) आहेत ते माझे मोठे बंधू मोहम्मद बिन जायद यांनी मला फारच प्रेमळ वागणूक दिली. मी आधी असा विचार केला होता की त्यांच्याकडे अधिक कर्ज मागणार नाही. मात्र अंतिम क्षणी मी निर्णय घेतला फार हिंमत करुन त्यांच्याकडे कर्ज मागण्याचं ठरवलं. मी त्यांना म्हणालो, जनाब तुम्ही माझे मोठे बंधू आहात. मला फार लाज वाटत आहे पण मी काय करणार मी फारच मजबूर आहे. आमच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला सर्वकाही ठाऊक आहे. तुम्ही मला अजून एक अब्ज डॉलर्स द्या,” अशी आठवण शाहबाज यांनी सांगितली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *