चौसाळा शाखेतील घोटाळा थांबेना, आणखी एका मयताच्या खात्यातील ६२ हजार ४५० रूपये गायब – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
चौसाळा शाखेतील घोटाळा थांबेना, आणखी एका मयताच्या खात्यातील ६२ हजार ४५० रूपये गायब
___
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेतील घोटाळा काही मिटता मिटेना मौजे. कानडीघाट ता.जि.बीड येथील मयत शेतकरी ग्यानबा बलभीम झोडगे यांच्या खात्यातील १ लाख रूपये परस्पर खात्यातमधुन गायब झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू असतानाच पुन्हा मौजे. कानडीघाट ता.जि.बीड येथील दुसरे शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांच्या खात्यावरील ६२ हजार ४५० रूपये परस्पर काढण्यात आले असून ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत जमा रक्कम उचलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बीड तालुक्यातील मौजे. कानडीघाट येथील शेतकरी धोंडीबा सर्जेराव कुडके यांचा दि.२ सप्टेंबर २०१९ रोजी मृत्यु झाला असून त्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत खाते क्रमांक ००१३११००२०१०७५३ असून त्या खात्यावरील त्यांच्या मृत्यूनंतर दि.११ ऑक्टोबर २०१९ २००० रूपये, दि.१४ नोव्हेंबर २०१९ २००० रूपये, दि.२३ डिसेंबर २०१९ रोजी १६ हजार,दि.४ मार्च २०२० रोजी ७००० रूपये,दि.०५ मे २०२० रोजी ५७०० रूपये,दि.२० ऑगस्ट २०२० रोजी २००० रूपये,दि.३१ डिसेंबर २०२० रोजी २००० रूपये,दि.१५ मार्च २०२१ रोजी ३४०० रूपये दि.१९ मे २०२१ रोजी २००० रूपये,दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी २००० रूपये,दि.०४ जानेवारी २०२२ रोजी २००० रूपये,दि.१२ जानेवारी २०२२ रोजी १४ ३५० रूपये,दि.०४ जुन २०२२ रोजी २००० रूपये एकुण ६२ हजार ४५० रूपये परस्पर खात्यातमधुन उचलण्यात आले आहेत.
गोलंग्री येथील महात्मा फुले कर्जमुक्ति गैरव्यवहार प्रकरणात ३ निलंबित
___
मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील शेतक-यांचे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ति प्रोत्साहन पर अनुदान योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशीचे आदेश दिले होते काल दि.१९ जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली असून चौसाळा शाखेतील ३ जणांना निलंबित करण्यात आले असून घोटाळ्याची मालिकाच हळुहळु बाहेर पडत आहे.
चौसाळा शाखेत शेतक-यांची आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत (S.I.T.)मार्फत चौकशी करा
___
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत आधिकारी-कर्मचारी आणि दलाल यांचे रॅकेट कार्यरत असुन अडाणी शेतक-यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर उचलून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत त्यामुळेच संबधित प्रकरणात (S.I.T.) मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. :- डाॅ.गणेश ढवळे