चीन : चीनपासून (China Corona) सुरुवात करून जगभरात पसरलेला कोरोनाने आता याच देशाला सर्वाधिक त्रास देत आहे. चीनच्या सरकारी शास्त्रज्ञाने देशातील सुमारे 80 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाल्याचं मान्य केलं आहे. डब्ल्यूएचओ आणि पाश्चात्य देशांच्या दाव्यांनंतर चीनने अखेर आपल्या मोठ्या लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सत्य स्वीकारले आहे. तसेच, चीनमधील लोकांच्या अधिक प्रवास करण्यामुळे कोरोना आणखी वाढू शकतो असंही त्यांनी म्हण्टलं आहे.
चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू जुन्यो म्हणाले की, चंद्र नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे काही भागात संसर्ग वाढू शकतो. चीनच्या या चंद्र नववर्षाला सुट्ट्या आहेत. त्यामुळे चीनमधील लोक आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात.
अलीकडेच चीनने आपले शून्य कोविड धोरण संपवून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. चीनने हे देखील मान्य केले आहे की 12 जानेवारीपर्यंत एका महिन्यात कोविडमुळे सुमारे 60,000 नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, तज्ञांचा असा विश्वास आहे की चीनने हा आकडा खूपच कमी लेखला आहे. अलीकडेच चीनमध्ये कोविडमुळे विक्रमी मृत्यू झाल्याची बातमी आली होती. विक्रमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण चीनने ‘रेकॉर्ड’ स्वीकारण्यास नकार दिला. ही आकडेवारी इतकी लपवली जात होती की खरी परिस्थिती समजून घेणे जागतिक आरोग्य संघटनेसाठीही आव्हानात्मक होते.