क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हा

हादरवणारी घटना !, दिवसाढवळ्या महिला तहसीलदाराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न


बीड नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील एका महिला नायब तहसीलदाराला भररस्त्यामध्ये पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
घटनेमुळे केवळ बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शुक्रवारी दुपारी घडली.

केज तहसीलच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यासोबत ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आशा वाघ या केज तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आहेत. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एका चारचाकी वाहनाने त्यांना रस्त्यामध्ये थांबवले, त्यानंतर चार जणांनी तेथून खाली उतरून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आशा वाघ थोडक्यात बचावल्या आहेत. सध्या त्याच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधीही कौटुंबिक वादातून त्याच्या भावाने त्याच्यावर असा हल्ला केला होता. सध्या या घटनेने संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. मध्यंतरी पेट्रोल ओतून महिला अधिकाऱ्याला जाळल्याची घटना ऐकून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *