राजधानी काठमांडूमधून पोखरा येथे निघालेले यती एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 5 हिंदुस्थानींसह 72 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे विमान लँड व्हायला अवघे १० सेकंद बाकी असताना हा अपघात झाला.
या दुर्घटनेमुळे साऱ्या जगात हळहळ व्यक्त केली जात असतानाच या दुर्घटनेचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे.
🚨Trigger Warning.
The guy who’s shooting this is from Ghazipur India. Moments before the crash. https://t.co/hgMJ187ele
— Gabbar (@GabbbarSingh) January 15, 2023
हा व्हिडीओ नक्की त्या दुर्घटनेचा आहे असे अधिकृतरित्या समोर आलेले नाही.
काठमांडू येथून पोखरा येथे जाण्यासाठी एटीआर 72-500 या दोन इंजिन्स असलेल्या विमानाने उड्डाण घेतले होते. पोखरा विमानतळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर असताना खराब हवामानामुळे हे विमान एका डोंगरावर जाऊन कोसळले आणि नंतर दरीत कोसळले, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व जण ठार झाले आहेत. यातील 60 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मदतकार्य अजूनही सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळारून दोघा जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. हे दोघेही स्थानिक मच्छीमार असल्याचे म्हटले जात आहे. ते विमानात नव्हते.