क्राईमताज्या बातम्या

जिलेबी बाबा, 120 महिलांवर रेप करणारा हा बाबा घरातील ‘हा’ रोजचा पदार्थ असा वापरायचा


फतेहाबाद : चहामध्ये नशेचे पदार्थ टाकून ती चहा महिलांना पाजत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बहुचर्चित जलेबी बाबाला फतेहाबादच्या जलदगती न्यायालयाने आज शिक्षा सुनावली.
नायालयाने या बाबाला 14 वर्षाच्या शिक्षेसह 35 हजार रुपये दंड, तसेच कलम 376 सी नुसार 7-7 वर्षाची शिक्षा, पोक्सो कायद्याअंतर्गत 14 वर्षाची शिक्षा आणि कलम 67 नुसार 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आर्म्स अॅक्टमध्ये न्यायालयाने बाबाला दोषमुक्त केले आहे. या बाबाचे महिलांसोबतचे 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर आले होते. या खटल्यात 6 पीडितांनी न्यायालयात हजर राहून बाबाच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश केला. पीडितांच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने निर्णय दिला.

10 जानेवारी रोजी बाबाला सुनावली शिक्षा

बाबा अमरपुरी ऊर्फ जलेबी बाबाला 5 जानेवारी न्यायालयाने दोषी ठरवले. यानंतर 10 जानेवारी रोजी बाबाला शिक्षा सुनावण्यात आली. हा जलेबी बाबा चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून महिलांना द्यायचा, मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.

2017 मध्ये एका महिलेने दाखल केली होती तक्रार

या अत्याचाराचे व्हिडिओ बनवून तो महिलांना ब्लॅकमेल करत पैसे उकळायचा. याप्रकरणी 13 ऑक्टोबर 2017 रोजी एका महिलेने टोहाना शहर पोलिसात बाबाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार टोहाना शहर पोलिसांनी बाबाविरोधात कलम 328, 376, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

यानंतर 19 जुलै 2018 मध्ये एका गुप्त बातमीदाराने पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कुमार यांना बाबाचा एक अश्लील व्हिडिओ दाखवला. तत्कालीन एसएचओ यांच्या तक्रारीवरुन खटला दाखल करण्यात आला.

बाबाच्या घरुन 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ जप्त

खटला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाच्या घरी छापा टाकून चिमटा, राख, विभूती, नशेच्या गोळ्या आणि व्हिसीआर जप्त केले. तसेच छापेमारीत बाबाचे 120 हून अधिक व्हिडिओ हाती लागले.

जिलेबीचा गाडा चालवायचा बाबा

अमरपुरी ऊर्फ जलेबी बाबा हा पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी आहे. 20 वर्षांपूर्वी तो मानसाहून टोहाना येथे कुटुंबासोबत आला. जलेबी बाबाला सहा मुले आहेत. टोहानामधील नेहरु मार्केटमध्ये त्याने जिलेबीचा गाडा सुरु केला. जवळपास 10 वर्षे त्याचा व्यवसाय व्यवस्थित सुरु होता.

पत्नीच्या निधनानंतर तांत्रिकाच्या संपर्कात आला

याच दरम्यान त्याच्या पत्नीचे निधन झाले. यानंतर तो एका तांत्रिकाच्या संपर्कात आला. दोन वर्ष जलेबी बाबा टोहानातून गायब होता. दोन वर्षांनी परतल्यानंतर त्याने टोहानामध्ये स्वतःचे घर घेतले आणि मुलांसह राहू लागला. याच घराजवळ त्याने बाबा बालकनाथच्या नावाने मंदिर बांधले होते.

घराबाहेर त्याने दुःख आणि कष्ट दूर करण्यासाठी फलक लावला. यानंतर तांत्रिक विद्येची जादू चालू लागली आणि त्याच्याकडे लोकांची गर्दी जमू लागली. शिवाय बाबाकडे भरपूर पैसे येऊ लागला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *