बीजिंग : चीनच्या जिआंगशी (China Jiangxi) प्रांतातील नानचांग काउंटीमध्ये आज (रविवार) झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) 17 जण ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही माहिती दिलीये.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे. नानचांग काउंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार, पहाटे 1 वाजण्याच्या आधी हा अपघात घडला. सध्या या अपघाताचं नेमकं कारण समजू शकलं नाही.’
चीनमध्ये कडक सुरक्षा नियंत्रण नसल्यामुळं रस्ते अपघात होताहेत. गेल्या महिन्यात धुक्यामुळं शेकडो वाहनं एकमेकांवर आदळली. यात एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. तर, सप्टेंबरमध्ये नैऋत्य चीनच्या गुइझोउ प्रांतात एका मोटरवेवर बस उलटून 27 प्रवासी ठार झाले होते.