लव्ह मॅरेज, चार वर्षांचा मुलगा अन् सहा महिन्यांची लेक, आता पत्नी फरार, तिचं पोस्टर घेऊन बाजारात भीक मागतोय पती
सिनेमातलं प्रेम, त्यातली लफडी अनेकांसाठी भारावून टाकणारी असतात. प्रत्यक्षात मात्र उलट चित्र आहे. पत्नीनं केलेल्या प्रतारणेनं व्यथित झालेल्या पतीला सध्या वणवण करत हिंडावं लागत असल्याची वेळ येऊन ठेपलीये.
कैमूर : सिनेमातलं प्रेम, त्यातली लफडी अनेकांसाठी भारावून टाकणारी असतात. प्रत्यक्षात मात्र उलट चित्र आहे. पत्नीनं केलेल्या प्रतारणेनं व्यथित झालेल्या पतीला सध्या वणवण करत हिंडावं लागत असल्याची वेळ येऊन ठेपलीये. परिस्थिती अशी आहे की, आपल्या दोन मुलांसह पतीला अक्षरश: कडाक्याच्या थंडीत भीक मागत दिवस काढण्याची वेळ आलीये. चार वर्षांचा मुलगा अँश आणि सहा महिन्यांची मुलगी कृतीला कडेवर घेऊन पती बाजारात फिरुन फिरुन भीक मागतोय. यात पती आपल्या बायकोचा फोटो घेऊन दारोदार तिचा पत्ता विचारत फिरतोय. हे सगळं पिल्मी वाटत असेल मात्र ही सत्यस्थिती आहे.
पत्नीच्या प्रतारणेमुळं पती सैरभैर
कूमैर जिल्ह्यात रामगढ परिसरात डहरक गावात कृष्ण मुरारी गुप्ता त्यांच्या बायकोनं केलेल्या प्रतारणेमुळं सैरभैर झालेत. त्यामुळं फरार झालेल्या पत्नीचा पोस्टर घेऊन ते बाजारात फिरतायेत. लोकांकडे भीक मागत आहेत. त्यांची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिचा अद्यापही शोध लागलेला नाही. मुलांच्या जबाबदारीमुळं त्यांची नोकरीही गेलीय.
पाच वर्षांपूर्वी झाले होते लव्ह मॅरेज
कृष्ण मुरारी आणि त्यांच्या पत्नीचा विवाह २०१७ साली झाला होता. त्यांची पत्नी एका वर्षांनंतर अनेकदा त्यांना सोडून गेलीय. अनेकदा तर प्रशासकीय प्रयत्नांमुळं त्यांचा संसार वाचला होता. पहिला मुलगा अंशच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या भांडणावेळी तिनं धारदार वस्तूनं कृष्ण मुरारी यांच्यावर हल्लाही केला होता.
नोकरी गेली आता भीक मागून गुजराण
आता कृष्ण मुरारी यांच्यावर दोन मुलांसह भीक मागण्याची वेळ येऊन ठेपलीय. मुलांचं पालन पोषण कसं करायचं असा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पत्नीशी लग्न झाल्यापासूनच हे सगळं लचांड मागं लागल्याचं त्यांनी सांगीतलयं. आता या दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरच पडलीय. मुलांना जन्म देऊन बायको फरार झालीय. लग्न झाल्यापासून किमान ३० ते ३५ वेळा ती घर सोडून गेल्याचं त्यांनी सांगितलंय.