पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडले जाणार नाहीं ते कार्ड रद्द सदर व्यक्ती आयटी कायद्यांतर्गत सर्व परिणामांना जबाबदार
नवी दिल्ली : जे पॅन कार्ड पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत आधार कार्डाशी जोडले जाणार नाहीं ते कार्ड रद्द समजले जाईल असा इशारा प्राप्तिकर विभागाने शनिवारी जारी केला आहे.
पॅन कार्ड आधार कार्डाला जोडणे अनिवार्य आहे, ते आवश्यक आहे, त्याला उशीर करू नका, आजच लिंक करा असे आयकर विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन कार्डधारकांसाठी,त्यांचे कार्ड आधारला जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठीची मुदत 31 मार्च 2023 ला संपणार आहे असे आयकर विभागाने नमूद केले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने मे 2017 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,या सक्तीतून काहीं विशिष्ट गटांनाच ‘सवलत श्रेणी’ देण्यात आली आहे. त्यात आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालय या राज्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्ती; आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी नागरीक अदिंनाच ही सवलत मिळू शकणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ने 30 मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की एकदा पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर, सदर व्यक्ती आयटी कायद्यांतर्गत सर्व परिणामांना जबाबदार असेल आणि त्याला अनेक परिणाम भोगावे लागतील.पॅनकार्ड निष्क्रीय झालेल्यांना आयकर रिर्टन भरता येणार नाही.
किंवा त्यांच्या परताव्यांची प्रक्रियाही केली जाणार नाही. या व्यतिरिक्त, अशा करदात्याला बॅंका आणि इतर आर्थिक पोर्टल सारख्या इतर मंचांवर अडचणी येऊ शकतात कारण पॅन हा सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाचा केवायसी निकष आहे असेही या परिपत्रकात म्हटले आहे.