अक्षय हा हा यवतमाळातील अभियांत्रिकीच विद्यार्थी आहे. मात्र, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने पैसे मिळवण्याच्या मोहापाई मामाच्या घरी चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.
यवतमाळ : काही दिवसापुर्वी उमरखेड येथे झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं आहे. ज्यांच्या घरी ही चोरी झाली त्यांच्या भाच्यानेच हा प्रताप केल्याच उघड झालं आहे. अक्षय नामदेव ढोले (२८) रा. सुकळी ता. आर्णी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वत: शौकापायी झालेलं कर्ज फेडण्यासाठी या पठ्यानं स्वत: च्या मामाचं घर फोडलं नऊ लाखाची चोरी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबरला उमरखेड येथील कैलास हरिभाऊ शिंदे यांच्या घरी चोरी झाली होती. १३ डिसेंबरला कैलास हरिभाऊ शिंदे हे माहूर येथे लग्नाकरिता गेले. हीच संधी हेरून अक्षय वेश्यांतर करून १४ डिसेंबरला दुपारी मामाच्या घरी पोहोचला. त्याने घराचे दार तोडून ४९ तोळे सोने, दोन किलो चांदी व एक लाख रुपये रोख असा नऊ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेने उमरखेड शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी तपास सुरु केला असता भाच्यानेच मामाच्या घरी चोरी केल्याची बाब उघड झाली होती.
अक्षय हा हा यवतमाळातील अभियांत्रिकीच विद्यार्थी आहे. मात्र, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने पैसे मिळवण्याच्या मोहापाई मामाच्या घरी चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरातील सदस्य लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्याने वेशातंर करुन घरात घुसून चोरी केली. पोलिसांनी आरोपी अक्षय ढोले याला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. अक्षयला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्याकडून चोरीतील ९० टक्के मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.